दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे डॉ. सुपे यांचे ग्लोबल अकॅडमी तर्फे सत्कार समारंभ पार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 21 जून 2022 | डॉ. डी. के. सी. विद्यालय डांभूर्णी येथे दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे डॉ. सुपे यांचे ग्लोबल अकॅडमी तर्फे सत्कार समारंभ पार पडला. दरम्यान विपुल फालक सर यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.

विपुल फालक सर याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून त्यांनी प्रथम आलेली विद्यार्थी निकिता विनोद कोळी यास 11 वी व 12 वी च्या विज्ञान शाखेच्या क्लासेस साठी डॉ. सुपेस ग्लोबल अकॅडमी मध्ये लागणारी संपूर्ण फी (१११००० रुपये ) ग्लोबल अकॅडमी तर्फे माफ केली. तसेच द्वितीय आणि तृतीय आलेले विद्यार्थी अनुक्रमे मनोज सुनील झूरकाळे (द्वितीय), माहेश्वरी मनोज नेवे (तृतीय),हितेश समाधान पाटील (तृतीय) यांना सुध्दा अल्पशः फीस मध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक श्री. उमाकांत महाजन सर, रवींद्र निळे सर व उद्घावकुमार पाटील सर यांनी आभार मानून मनोगत व्यक्त केले.

विपुल फालक सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कोणतीही गुणपत्रिका विद्यार्थ्याचे भविष्य निश्चित करत नाही आणि जीवनात यशस्वी बनण्यासाठी उत्तम बना, श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करू नका.स्पर्धा स्वतः सोबत करा.तसेच डॉ.सुपे ग्लोबल अकॅडमीचे संचालक डॉ.सुपे सर हे नेहमीच विद्यार्थ्याच्या मदतीसाठी नेहमी कार्यरत असतात हे ही सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम