माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी केली पंचायत समितीची झाडाझडती

बातमी शेअर करा...

पारोळा

येथील पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकारी नाही कर्मचारी नाहीत तालुक्यातील लाभार्थी वाऱ्यावर फिरत आहेत टक्केवारी घेऊन काम केली जातात प्रशासनाचा कोणताही वचक राहिलेला नाही. काल-परवाच लाच लुचपत विभागाने छापा टाकून लाच खोरांना जेरबंद केले असल्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन झाडाझडती प्रसंगी खडसाविले. सत्ताधाऱ्यांनी टक्केवारी घेऊन कामे देणे ती पंचायत समिती मार्फत करून घेणे कामे देताना व कामे करून घेताना टक्केवारी घेणे यासाठी प्रशासन शासनाचा कोणताही वचक राहिलेला नाही व फक्त माया जमवण्यासाठी आमदारांकडून त्यास कोणताही विरोध न करता आपल्याकडे कसा गोरगरिबांचा पैसा ओढून घेता येईल म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकांसाठी कोणताही पर्याय घेतला जात नाही या सर्व साधारण जनतेच्या सिंचन विहिरी, घरकुल प्रकरणे गावा गावातील कुटुंबांसाठी देण्यात आलेले योजना, गोठा शेड घरकुल योजना, मनरेगा मार्फत कामे आणून द्यायचे दहा टक्के घ्यायची व ती पंचायत समितीमार्फत करून घ्यायचे व त्या लाभार्थ्यांचे परत पंचायत समिती मार्फत शोषण करून घ्यायचे पंचायत समितीमध्ये कोणी भागीदारी नसल्यामुळे आपणास तेथे कसा वाटा मिळेल व तिथे कसा पैसा वसूल करता येईल असा अट्टाहास चालू आहे असा आरोप माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी केला.

 

गट विकास अधिकारी किशोर शिंदे यांनी सहा महिन्यात 25 करोड रुपये कमावले याची चौकशी करावी व पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्यावा, तर लाज लुचपत विभागाची कारवाई गटविकास अधिकाऱ्यांवरच होती परंतु दुसरेच खालचे एजंट सापडले आहेत अशी कैफियत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून मांडली. असा आरोप माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम