डॉ.श्रीकांत शिंदे यांनी श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन घेतले मनोभावे दर्शन

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ७ एप्रिल २०२४ | खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे
अंबरनाथ हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. अंबरनाथ शहरात सिमेंटचे पक्के रस्ते, यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र, शूटिंग रेंज, नाट्यगृह, नेहरू गार्डन, शिवमंदिर परिसर विकास अशा चांगल्या सुविधा दिल्या आहेत. तिसरी चौथी रेल्वे मार्गिका, चिखलोली रेल्वे स्थानक यांची कामे सुरू असून लवकरच १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यात येणार आहे. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. तसेच शहराला स्वतंत्र जलस्रोत निर्माण करणे, ऑलिम्पिक दर्जाचे स्विमिंग पूल उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.

शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलसारखा जागतिक दर्जाचा महोत्सव अंबरनाथमध्ये होतो, त्यामुळे सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले. तर येत्या काळात येथे ज्येष्ठ नागरिक भवन उभारणार असल्याचेही यावेळी सांगितले.

अंबरनाथ येथील श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन आज मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम