उपाशी पोटी कॉफी अतिसेवन केल्यास होवू शकता गंभीर आजार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ ।  भरपूर लोकांना दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करायला आवडते. पण कॉफीमुळे रिलॅक्स वाटते आणि तणाव कमी होतो. मात्र कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफीचे अतिसेवन केल्याने किंवा रिकाम्या पोटी कॉफी पिण्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये भरपूर कॅफेन असते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यामुळे एखाद्या व्यक्तीला हाय स्ट्रेस होऊ शकतो. तसेच मूड स्विंग्सही निर्माण होऊ शकतात. कॉफीचा शरीरावर कसा प्रभाव पडतो आणि कोणत्या वेळी कॉफी पिणे योग्य ठरते ते जाणून घेऊया. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होतो. सकाळी कॉफी प्यायल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. कॉफी केवळ ॲसिडिक नसेत तर ती पोटासाठी कठोरही ठरू शकते. यामुळेच काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यानंतर अस्वस्थ वाटते.

कॉफीमध्ये डायटरपीन नावाचे ऑयली कंपाऊंड असते, जे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. फॅट्सयुक्त अन्नाचे सेवन, लठ्ठपणा, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो. याशिवाय कॉफीच्या अतिसेवनामुळे स्ट्रोक आणि हृदयविकार होऊ शकतो. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास गॅस आणि पोटासंबंधी इतर विकार होऊ शकतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर कॉफी पिण्यापूर्वी काहीतरी खाण्याची सवय लावावी. एखादे फळ किंवा ड्रायफ्रूट खाल्याने अपचनाचा त्रास होणार नाही. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी घेतल्याने हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे काही खाल्ल्यानंतरच कॉफी प्यावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम