‘दृश्यम 2’ ने आठ दिवसात केली तुफान कमाई !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० नोव्हेबर २०२२ सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट सध्या तरी अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग पाहता पहिल्या दिवशी जवळपास 12 कोटी रुपयांची कमाई होईल असा अंदाज वर्तवला जात होता.

मात्र दृश्यम 2 ने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच चकीत केलं. अजय देवगण आणि अक्षय खन्ना यांचा हा चित्रपट या वर्षभरातील सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.38 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी 15 कोटींपेक्षा जास्त कमाई करणं ही खूप चांगली बाब आहे. मात्र दृश्यम 2 हा चित्रपट रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ला मागे टाकण्यात अपयशी ठरली. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाची ओपनिंग कमाई ही जवळपास 36 कोटी रुपये इतकी झाली होती. त्यामुळे या वर्षातील सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा पहिला चित्रपट ब्रह्मास्त्र तर दुसरा दृश्यम 2 ठरला आहे.

राम सेतू- 15.25 कोटी रुपये
भुल भुलैय्या 2- 14.11 कोटी रुपये
बच्चन पांडे- 13.25 कोटी रुपये
लाल सिंग चड्ढा- 11.70 कोटी रुपये
सम्राट पृथ्वीराज- 10.70 कोटी रुपये
विक्रम वेधा- 10.58 कोटी रुपये
गंगुबाई काठियावाडी- 10.50 कोटी रुपये
शमशेरा- 10.25 कोटी रुपये

दृश्यम आणि दृश्यम 2 हे साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक आहेत. 2015 मध्ये दृश्यम हा चित्रपट प्रदर्शित झाला. सीक्वेलमध्ये अजय देवगण आणि अक्षय खन्नासोबत श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर यांच्या भूमिका आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम