Drishyam 2 Trailer : पणजीचे सत्संग, पावभाजी कथा संपणार ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ ।  जो चित्रपट आजही टेलिव्हिजनवर आला की कोणीही त्या चित्रपटामधील कथा जी इतकी रंजक आहे की चाहत्यांना ती पाठच झाली आहे. त्याचाच दृष्यम 2 चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दृष्यमची चर्चा होती. अजय देवगणचा प्रभावी अभिनय, आणि दमदार संवाद, यामुळे दृष्यमला साऊथची कॉपी असूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

त्याच्या टीझरचं प्रेक्षकांनी कौतूक केलं होतं. रहस्य. उत्कंठावर्धक आणि पावलोपावली प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारा दृष्यम प्रेक्षकांचे आगामी आकर्षण आहे. त्याच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना वेडावून टाकले होते.

 

सत्याला तुम्ही कितीही पराजित करण्याचा प्रयत्न केला तरी ते काही पराजित होत नाही. याउलट ते वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यत ते येतेच. दृष्य़म 2 मध्ये मीरा देशमुखचा प्रवास अजुनही सुरु आहे. तिला काही केल्या आपल्या मुलाचा खुनी शोधायचा आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. मात्र यासगळ्यात ज्यानं हे काम केले आहे त्याच्यापर्यत पोहचुनही ती तोच गुन्हेगार आहे हे सिद्ध करु शकत नाही. मीराला ही गोष्ट सतावणारी आहे. वायकॉम 18 स्टुडिओच्या वतीनं आणि टीसीरिजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होती. मुळ साऊथच्या दृष्यमची कॉपी असणाऱ्या हिंदी दृष्यमच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. त्याची बरीच चर्चाही होती. तब्बल सात वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम