गुगलच्या एका चुकीमुळे मोदी सरकारने दिली कोट्यांवधीचा दंड

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ । सध्या सोशल मिडीयाच्या डिजिटल युगात सर्वच लोक गुगलचा वापर करीत असतांना पण यंदाची दिवाळी गुगलला सुखाची, समाधानाची जाईल, असे दिसत नाही. गुगलला ही दिवाळी मोठ्या नुकसानीची जावू शकते. कारण, भारतातील कंप्टीशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने ऐन दिवाळीत जोरदार धमाका केला आहे. यामुळे गुगल कंपनीला जोरदार धक्का बसला आहे. सीसीआय कडून गुगलवर मोठा दंड ठोठावला गेला आहे. सीसीआय कडून एका महिन्यात दोनदा दंड ठोठावला गेला आहे. त्यामुळे दंडाची रक्कम खूप मोठी झाली आहे. गुगल विरोधात याआधी १,३३७.७६ कोटी रुपये आणि आता ९३६ कोटी रुपयाचा दंड ठोठावला गेला आहे. Competition Commission of India ने Google वर अँटी कंप्टिशन संबंधी दोन प्रकरणात हा दंड ठोठावला आहे. यातील दंड app store billing policies संबंधित आहे.

सीसीआय अर्थात कंप्टीशन कमशन ऑफ इंडिया ने Google ला दोषी ठरवत म्हटले की, अमेरिकी कंपनी मार्केट मध्ये आपली मजबूत पोझिशनचा चुकीने फायदा घेतला आहे. सीसीआय ने गुगल वर अँटिकप्टिशन प्रॅक्टिस बंद करण्याचा आरोप लावला आहे. खरं म्हणजे, जीमेल (Gmail), गूगल मॅप (Google Map), अँड्रॉइड प्लॅटफॉर्म (Android Platform), गूगल सर्च प्लॅटफॉर्म (Google Search Platform) सारखे अनेक गुगल प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

या गुगल सर्विसमुळे गुगलकडे डेटा आणि डिटेल्सचा मोठा साठा आहे. याचा वापर जाहिरात आणि मार्केटिंगसाठी केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात गुगल सर्विसेज व प्रोडक्टचे जाळे असल्याने कंपनी गुगलच्या तुलनेत उभी राहू शकत नाही. सीसीआयने Competition Commission of India नियमाला विरोधी सांगितले आहे. सीसीआयकडून गुगलवर २२७३ कोटी रुपयांहून जास्त दंड ठोठावला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम