या राज्यात जाणविले मध्यरात्री भूकंपाचे धक्के !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ मार्च २०२३ ।  गेल्या काही दिवसापासून जगभरातील काही देशात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर आता भारतातील राजस्थानपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, राजस्थानच्या बिकानेरमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

त्याचवेळी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग इथंही भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 मोजली गेली. शनिवार आणि रविवारी मध्यरात्री 1.45 वाजता चांगलांग इथं भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर 30 मिनिटांनी बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही ठिकाणी जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू बिकानेरपासून 516 किमी पश्चिमेला होता.

गेल्या काही महिन्यांपासून उत्तराखंड, हिमाचल, ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. चार दिवसांपूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.7 एवढी होती. हा भूकंप दुपारी 4.42 वाजता झाला. त्याचं केंद्र नांगलोई होतं. याच्या एक दिवस आधीही दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.8 होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद इथं होता. सुमारे 30 ते 40 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले आणि लोक घाबरून घराबाहेर पडले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम