चार दिवसापासून पाकिस्तानात जाणवत आहे भूकंपाचे धक्के

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ नोव्हेबर २०२३

जगभरातील काही देशात भूकंपाचे धक्के जाणवत असतांना गेल्या चार दिवसापासून पाकिस्तानात देखील तीव्र भूकंपाचे धक्के जाणवत आहे. नुकतेच १५ नोव्हेंबर रोजी पहाटे 5.35 वाजता 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार , कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

११ नोव्हेबर शनिवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता पाकिस्तानमध्ये 4.1 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. आणि 4 दिवसांनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा भूकंपाने हादरला. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 18 किलोमीटर खाली होता. पृथ्वीच्या आतील प्लेट्सच्या एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतात.

भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपली पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्सची टक्कर झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीच्या खाली असलेल्या या प्लेट्स अतिशय संथ गतीने सरकत राहतात. दरवर्षी या प्लेट्स त्यांच्या जागेपासून 4-5 मिमी सरकतात. या कालावधीत, काही प्लेट्स इतरांपासून दूर जातात आणि काही इतरांच्या खाली सरकतात. या काळात प्लेट्सच्या धडकीमुळे भूकंप होतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम