पहाटेच्या सुमारास अफगाणिस्तानातला बसले भूकंपाचे हादरे
बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३
अफगाणिस्तानात गेल्या चार दिवसांपूर्वी देखील भूकंपाचे हादरे बसले असतांना आता पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. आज 11 ऑक्टोबर रोजी पहाटे अफगाणिस्तानच्या वायव्य भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. हेरात प्रांताच्या राजधानीपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर हा भूकंप आला.
चार दिवसांपूर्वी म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मोठी वित्तहानी देखील याठिकाणी झाली होती. अफगाणिस्तानातील हा भूकंप दोन दशकांतील सर्वात भीषण भूकंप असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे.
हेरात हे अफगाणिस्तानातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. शनिवारी झालेल्या भूकंपानंतर मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू हेरातच्या वायव्येस 40 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान आज पुन्हा एकदा भूकंप झाल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. तालिबानचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. 1,240 लोक जखमी झाले आहेत आणि 1,320 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम