वजन कमी करायचे जेवणासोबत हे खा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जानेवारी २०२३ । तुम्ही नेहमी वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले असतील पण जर तुम्ही नेहमी जेवणात लोणचे खात असाल तर तुमचे नक्की वजन कमी होण्यास मदत होईल.अनेकांना जेवणासोबत चटकदार तोंडी खावसं वाटतं अशात जेवणात पापड किंवा चटणी किंवा लोणचं हवं असते. मात्र अनेकजण सर्दी खोकला नको व्हायला यासाठी लोणचं खाणे टाळतात पण तुम्ही जर लोणचं खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल. कारण लोणचं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. होय. आज आपण लोणचं खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
लोणचं खाण्याचे फायदे

1. अनेकांना फारशी भूक लागत नाही किंवा जेवण जात नाही. पण जेवणात कैरीचं किंवा लिंबाचं लोणचं समाविष्ट केल्यास तोंडात लाळ जास्त स्त्रवते ज्यामुळे भूक वाढते. आणि उत्तम जेवण होतं

2. मधूमेही रुग्णांनी आवळ्याचं लोणचं खावं. ते त्यांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतं.

3. मुरवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक नावाचे जिवाणू असतात. आतड्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर असतात.
4. अनेकांना वजन वाढीच्या समस्या असतात. अशात लोणचं खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण लोणच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अधिक असतं.

5. लोणच्यामध्ये व्हिटामिन्स के असतं जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याशिवाय लोणच्यामध्ये अँटीऑंक्सिडट्स घटक असतात.

6. लोणचं पचनक्रिया वाढविण्यासही मदत करते. त्यामुळे आवर्जून जेवणात लोणचं खावं, असा अट्टहास असतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम