यासोबत दही खाल्यास होवू शकतो गंभीर आजार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ फेब्रुवारी २०२३ । नुकताच हिवाळा संपत आलेला आहे. तर दुसरीकडे उन्हाळा काही प्रमाणात सुरु झालेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात नागरिक मोठ्या प्रमाणात थंड पेय घेत असतात, बहुतांश लोक आपल्या आहारात दह्याचा समावेश करतात. दही खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. काही लोक दही लस्सी म्हणून देखील खातात. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की दहीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात. पौराणिक मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी दही आणि साखर खाण्याची परंपरा आहे.

दह्यामध्ये अनेक फायदेशीर बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे आपला मेटाबॉलिझम रेट ठीक राहतो आणि पचनाची समस्या दूर होते. याशिवाय दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड, व्हिटॅमिन बी-12, बी-6, लोह, राइबोफ्लेविन आणि कॅल्शियम सह अनेक पोषक घटक आढळतात.

बरेच फायदे असूनही आहारतज्ञ दह्याबरोबर काही गोष्टी खाण्यास स्पष्ट नकार देतात कारण असे केल्याने आरोग्य बिघडू लागते. आपल्याला माहित आहे की, दही तयार करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, परंतु आहारतज्ञ दूध आणि दही यांचे मिश्रण दूर ठेवण्याचा सल्ला देतात. दूध आणि दही एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटीची गंभीर समस्या निर्माण होते, ज्यामुळे पोटदुखी सुरू होते. बहुतेक आरोग्य तज्ञ दह्यासह फळांना दूर ठेवण्याबद्दल बोलतात. याचे खरे कारण असे म्हटले जाते की दही आणि फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एंजाइम असतात जे आपली पचनशक्ती कमकुवत करतात. दही हा थंड पदार्थ असल्याने तो गरम पदार्थांसोबत घेऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे केल्याने दातांमध्ये समस्या उद्भवू शकतात. काही लोक मीठासह दही खातात, दही मीठ घालून खाऊ नये त्यानेही अनेक समस्या निर्माण होतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम