तुम्हाला जास्त खाणे ही पडणार महागात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ नोव्हेबर २०२२ सध्याच्या काळात बाजारपेठेत भरपूर चटपटीत विक्रीला आल्याने आपण नेहमीच बाहेरचे खाणे व भरपूर खाणे पसंद करतो पण हेच भरपूर खाणे आपल्यासाठी हानिकारक आहे. काही वैद्यकीय बाबतींतही असतात. खा – खा करण्याच्या या आजाराबद्दल असलेला मोठा गैरसमज म्हणजे महिला, मुलींमध्ये पुरुषांच्या तुलनेत हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

लहानपणापासूनच मेंदूच्या रचनेशी या आजाराचा संबंध असतो. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये असलेला हा आजार आणि स्त्रियांमध्ये असलेला हा आजार यातही बराच फरक आहे. मात्र गमतीची किंवा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, यासंदर्भात जेवढी काही संशोधने केली गेली, सर्वेक्षणे केली त्यात सहभागी होण्यातून पुरुषांना वगळण्यात आले. केक स्कूल ऑफ मेडिसिन ऑफ यूएससी येथे डेला मार्टिन सेंटरमधील मानसोपचार आणि वर्तणूक विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक स्टुअर्ट मरे म्हणाले, मुलगे आणि पुरुषांना याविषयीच्या आजाराविषयक कोणत्याही संसोधनातून वगळण्यात आले होते. त्यामुळे केवळ महिला रुग्णांचाच अभ्यास करून यावरील उपचारपद्धती तसेच औषधे विकसीत केली जात होती. खाण्याविषयक काही आजार हे महिला तसेच पुरुषांमध्ये सारख्याच प्रमाणात प्रचलित आहेत.संशोधनाने हेसुद्धा सिद्ध केलं आहे की, खाण्याविषयक आजार हे मेंदूचेच आजार आहेत. सामाजिक दबाव किंवा इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळेच हे आजार होतात, असा जो समज आहे तो, अयोग्य आहे. मेंदूच्या विकासाचे मूल्यांकन करणारा यूएस मधील सर्वात मोठे सर्वेक्षण असलेल्या किशोरवयीन मेंदूच्या संज्ञानात्मक विकास अभ्यासातील डेटा वापरून, संशोधकांनी काही निरीक्षणे मांडली. या अभ्यासातील 11,875 सहभागींमधून 38 मुले आणि 33 मुलींना अती खाण्याचा विकार झाला होता. तर एकूण सहभागी मुलांपैकी ५७ टक्के मुलांना तर ४३ टक्के प्रौढ पुरुषांना खाण्याविषयक विकार होते. संशोधकांना संपूर्ण मेंदूतील संरचनात्मक मेंदूच्या शरीरशास्त्रातील फरक तपासण्यास एक न्यूरोइमेजिंग यंत्र मदत करते. त्याआधारे करण्यात आलेल्या तपासणीत असे दिसून आले की, अती खाण्याचा विकार असलेल्या मुलांच्या आणि मुलींच्या मेंदूच्या रचनेत बराच फरक होता.

पुरुषांच्या आणि महिलांच्या मेंदूची संरचना निरनिराळी असल्याने अती खाण्याचा आजार त्यांच्या मेंदूवर निरनिराळ्या पद्धतीने परिणाम करतो. तसेच हा आजार होण्याची कारणे आणि परिस्थिती दोघांच्या मेंदूत वेगवेगळी असू शकते. त्यामुळेच स्टुअर्ट मरे म्हणतात, अती खाण्याच्या आजारांवर नव्या उपचारपद्धती आम्ही शोधत आहोत. त्यामध्ये डायरेक्ट करंट स्टिम्युलेशन आणि ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन चा समावेश आहे. ज्या उपचारपद्धती थेट मेंदूला लक्ष्य करतील. स्टुअर्ट मरे पुढे म्हणतात, खाण्याच्या विकारांवरील संशोधन करताना आता आम्ही महिलांसोबत पुरुषांचाही समावेश करणार आहोत. त्यामुळे त्यांच्यासाठी योग्य ती उपचारपद्धती विकसीत करण्यात कदाचित आम्हाला यश येईल. नाहीतर असे होईल की पुरुषांच्या मेंदूचा अभ्यास न करताच आम्ही त्यातील विशिष्ट घटकांना टार्गेट करत असू. मरे आणि त्याची टीम हे पाहण्यासाठी चाचणी करेल की, भिन्न रचना असण्यासोबतच, खाण्याचे विकार असलेल्या स्त्री-पुरुषांचे मेंदू वेगळे कार्य करतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम