डाएटिंग न करता हे पदार्थ खाल्याने होईल वजन कमी !
दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ । तुम्ही जर मागील काही वर्षापासून सध्या लठ्ठपणा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला ते जाणवत असेल. पण लठ्ठपणामुळे तुम्ही अनेक धोकादायक आजारांना बळी पडू शकता. अशा परिस्थितीत वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग, व्यायाम करतात. पण आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही पदार्थांमुळेही वजन नियंत्रित करता येते.
1) मधाचे सेवन करा – मध हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतोच. त्याचे सेवन करून तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी कोमट पाण्यात मध मिसळून ते पाणी रोज रिकाम्या पोटी प्यावे. हे चरबी कमी करण्यास उपयुक्त आहे.
2) हळद ठरते फायदेशीर – हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. ती अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीच्या नियमित सेवनाने तुम्ही लठ्ठपणाही कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी पाण्यात हळद घालून ते उकळून घ्यावे, आणि नंतर ते पाणी प्यावे.
3) दालचिनीचा करा वापर – दालचिनी ही अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याच्या वापरामुळे मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही दररोज कोमट पाण्यासोबत दालचिनीचे सेवन करू शकता.
4) लिंबू ठरते प्रभावी – लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी आणि फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा आहारात समावेश करू शकता.
5) जिऱ्याचे सेवन करा – जिरे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजी फोडणील घालताना अनेक जण त्यात जिरं घालतात. वजन कमी करण्यासाठी देखील जिरं उपयुक्त ठरतं. त्यासाठी रात्रभर पाण्यात जिरं भिजवून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावं.
6) मेथी दाणे – मेथीचे दाणे किंवा बियांमध्ये फायबर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. याच्या सेवनाने पचनाच्या समस्यांवरही मात करता येते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम