हिवाळ्यात ‘हे’ फळ खाल्याने आरोग्य राहील ठणठणीत

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ नोव्हेबर २०२२ दरवर्षी हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला सर्दी खोकला होत असेल तर यंदाच्या हिवाळ्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असेल त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. विशेषत: हिवाळ्यात फळे खाणे खूप आवश्यक आहे. कारण फळांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

अनेकजणांना हिवाळ्यात कोणती फळे खावीत? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात खाणारी काही खास फळे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

सफरचंद- सफरचंद खरं तर बाराही महिने मार्केटमध्ये असते पण त्याचा खरा हंगाम हा हिवाळ्यात असतो. असं म्हणतात की दररोजचे एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांपासून दूर राहतो. हे खरंय आहे. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यातील फायबर, व्हिटीमिन्स C आणि K आपल्या शरिराला मुबलक उर्जा देतात.

पेरू- पेरू हा खरं तर हिवाळ्यात येतात. सर्दीमुळे अनेकजण पेरू खाणे टाळतात पण पेरुमध्ये असणारे व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे शक्यतो पेरू खावेत.

डाळिंब- थंडीच्या दिवसात डाळिंब खाणे आरोग्यासाठी उत्तम असतं. तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता तर दूर होतेच सोबतच वजन कमी करण्यासही डाळींब महत्त्वाची भूमिका बजावतो.

गाजर – हिवाळ्यात गाजर आवश्यकच आहे. हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. गाजरमधील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

आवळा- आवळा हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर फळ आहे. आवळ्याचा रस दररोज पिल्याने केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. लिव्हरसाठीही आवळा खूप फायदेशीर आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम