हे फळ सेवन केल्याने होणार आठवड्यात वजन कमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ डिसेंबर २०२२ । आपण नेहमी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून पाहत असतो पण त्यातली वजन वाढीच्या समस्या ही खूप सामान्य झाली आहे. अनेकजण वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात पण अनेकदा त्याचा काहीही फायदा होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एक हटके उपाय सांगणार आहोत.

जर काही फळे तुम्ही दररोज खाल्ली तर तुमचे वजन झटक्यात कमी होऊ शकते. चला तर जाणून घेऊया ती फळे कोणती?

सफरचंद – दररोज एक जरी सफरचंद खाल्ले तरी ते आरोग्यासाठी उत्तम असतं. सफरचंद तुम्ही फ्रुट सलाद म्हणूनही खाऊ शकता. सफरचंद मध्ये भूक भागवण्याची क्षमता असते त्यामुळे वजन कमी करण्यासही ते मदत करतं. याशिवाय हानीकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यास सफरचंद मदत करतं.

द्राक्षे – द्राक्षेसुद्धा शरीरातील हानीकारक कोलेस्टेरॉल कमी करतं त्यामुळे वजन कमी करण्याचा मार्ग मोकळा होतो.

पपई – पपईसुद्धा हानिकारक कोलेस्टेरॉल वेगाने कमी होते. पपईमध्ये फायबर, व्हिटॅमन सी, अँटीऑक्सिडंट असे पोषक घटक असतात. त्यामुळे पपई वजन कमी करण्यास अधिक मदत करते.

लिंबू – हानिकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लिंबू हे अधिक फायदेशीर आहे. याशिवाय रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीही लिंबू महत्त्वाची भूमिका बजावते. सकाळी कोमट पाण्याच लिंबू उपाशीपोटी पिल्याने फायदा होतो.

ब्लुबेरी – वजन कमी करण्यासाठी ब्लूबेरी अधिक फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि फायबरचा देखील समावेश असतो.

संत्री – वजन कमी करायचं असेल तर संत्री हे तुम्ही दररोज खायलाचं हवी. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असतं जे शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं.

किवी – किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला कमी दिवसांमध्ये वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात किवी हे फळ असायलाच हवे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम