राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची आज ईडी चौकशी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मे २०२३ ।  राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना गेल्या काही दिवसाआधी ईडीची नोटीस आली होती तर आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता आपण ईडी कार्यालयात हजर राहणार आहोत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक होत प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्यात आंदोलन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते सज्ज झाले आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL&FS) संबंधित गैरव्यवहाराचे हे प्रकरण आहे. या कंपनीने अनेकांना नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्याप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान, जयंत पाटील यांचे नावही समोर आले आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडीचौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कारवाईविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई दाखल झाले आहेत. तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजप विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. जयंत पाटील यांना ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

नेमके प्रकरण काय?
ED च्या सूत्रांनी सांगितले की, IL&FS मध्ये कथित कर्ज घोटाळा आणि मनी लाँड्रिंगचे प्रकरण 2019 मध्ये उघडकीस आले होते. प्रथम स्थानिक स्तरावर तपास करण्यात आला, ज्यामध्ये सापडलेल्या तथ्यांच्या आधारे ईडीने 2019 मध्येच तपास सुरू केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने IL&FS समूहाच्या कंपन्या IRL, ITNL आणि या कंपन्यांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. IL&FS ने कोहिनूर CTNL ला कर्ज दिले होते आणि इक्विटी गुंतवणूक देखील केली होती. सीटीएनएलने कर्ज भरण्यात चूक केली आहे. राज ठाकरे हे देखील CTNL मध्ये भागीदार होते. मात्र, नंतर त्याचे शेअर्स विकून ते बाहेर पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज ठाकरे यांनी त्याच वर्षी शेअर्स विकले जेव्हा IL&FS ने CTNL चे शेअर्स तोट्यात विकले. याच प्रकरणात जयंत पाटील यांचेही नाव समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम