थंडीत खाद्य तेलाचा भडका ; जाणून घ्या काय आहे दर ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ थंडीत खाद्यतेलाची मागणी वाढल्याचा परिणामही दिसून आला. त्यामुळे मोहरी, सोयाबीन तेल, कापसाच्या बियाणाचे तेल, सीपीओ आणि पामोलिन तेलाचे भाव तेजीत होते.थंडीत पचनासाठी हलक्या तेलाचा वापर वाढतो. ग्राहक अधिक उष्मांक देणारे मोहरी, शेंगदाणा आणि सोयाबीन तेलाचा प्राधान्य देतात. त्यामुळे थंडीची लाट येताच या तेलाची मागणी वाढली आहे.

पामोलिन तेल आणि सीपीओचे दर कमी असल्याने त्यांची मागणी वाढली होती. परिणामी त्यांच्या बाजार भावात थोडी वृद्धी झाली. तर आहारासाठी योग्य असल्याने कापासाच्या बियाण्यापासून तयार तेलाची मागणी वाढली. त्यामुळे दरात वृद्धी झाली.

भारताने खाद्य तेलाची आयात थांबवावी आणि देशातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करुन त्यांना वाचवावे अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. गुजरात स्टेट एडिबल ऑईल अँड ऑईलसीड असोसिएशनचे अध्यक्ष समीर शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयीचे पत्र पाठविले आहे.

संघटना यंदा केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराज झाल्या आहेत. यंदा, 2021-22 मध्ये खाद्यतेलाची आयात प्रचंड वाढली आहे. यंदा देशात 1 कोटी 41 लाख टनाहून अधिक खाद्यतेलाची आयात करण्यात आली आहे.

मोहरीच्या तेलाचे भाव 7,300-7,350 रुपये प्रति क्विंटल आहे.
शेंगदाणा तेलाचे दर 6,585-6,645 रुपये प्रति क्विंटल आहे.
शेंगदाणा तेलाचे दर मिल डिलव्हरी 15,100 रुपये प्रति क्विंटल आहे.
रिफांईड शेंगदाणा तेलाचे दर 2,445-2,705 रुपये प्रति टिन आहे.
मोहरी पक्की घानी तेल 2,250-2,380 रुपये प्रति टिन आहे.
तिळाचे तेल 18,900-21,000 रुपये प्रति क्विंटल आहे.
सोयाबीन तेल मिल डिलिव्हरी दिल्ली- 14,200 रुपये प्रति क्विंटल आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम