राज्यातील शिक्षणतज्ज्ञ हरपला : डॉ.गोसावी यांचे निधन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जुलै २०२३ ।  राज्यात शैक्षणिक क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ व गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.मो.स.गोसावी (वय 88) यांचे दि.८ रोजी मध्यरात्री पावणेदोनला निधन झाले. आज दि.९ रोजी रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे मुले शैलेश आणि कल्पेश आणि कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे. कमी वयात महाविद्यालय प्राचार्य म्हणून गोसावी यांची निवड झाली होती.

याबद्दल कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी केलेले कौतुक ते आवर्जून सांगत. श्रीमद्भगवद्गीतेचे ते अभ्यासक होते. गीता, ज्ञानेश्वरी याविषयक पुस्तके त्यांनी लिहली आहेत. काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बीवायके महाविद्यालयात ठेवले जाणार आहे. तर सायंकाळी साडे पाचला नाशिक येथील अमरधाम येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम