हिवाळ्यात अंडीचे दर वाढले

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ डिसेंबर २०२२ । राज्यात थंडीचा तडाखा वाढत असल्याने आरोग्यासाठी महत्वाचे मानले जाणारे अंडीची मागणी प्रंचड वाढत आहे तर राज्यांसोबतच दक्षिणेकडीला राज्यही थंडीनं व्यापून गेली आहेत. हिवाळ्यात शरीराल ऊब देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. अशा पदार्थांपैकी एक म्हणजे, अंड. थंडींच अंड्यांची मागणी वाढते. त्यामुळे या दिवसांत अंड्यांचे दरही वाढतात.

राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, बिहार अशा देशांतील अनेक राज्यांमध्ये आता कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये अंड्याची मागणीही वाढते. अशा परिस्थितीत, हिवाळ्याच्या हंगामात त्याच्या मागणीसह, किमतीत वाढही देखील नोंदविली जाते. जाणून घेऊया तुमच्या शहरांत अंड्यांचे दर कमी झाले की, वाढले त्याबाबत सविस्तर महाराष्ट्रातही पारा उतरला असून थंडीची हुडहुडी वाढली आहे. त्यासोबतच राज्यातील मुंबई, पुण्यातही थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातही अंड्यांची मागणी वाढली आहे. मुंबईत सध्या अंड्याची प्रति नग किंमत 5.76 रुपये इतकी आहे. तर पुण्यात 5.76 रुपये दरानं एक अंड विकलं जात आहे. अंड्यांची मागणी जास्त वाढली तर दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मुंबईत अंड्याची किंमत 5.76 रुपये प्रति नग

पुण्यात अंड्याची किंमत 5.60 रुपये प्रति नग

दिल्लीत अंड्याची किंमत 5.76 रुपये प्रति नग

कोलकात्यात अंड्याची किंमत 5.90 रुपये प्रति नग

चेन्नईमध्ये अंड्याची किंमत 5.50 रुपये प्रति नग

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम