दै. बातमीदार । २५ जून २०२३ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा अटोपून इजिप्तमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचं त्या देशातही जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. एका इजिप्तशियन महिलेने त्यांच्या स्वागतार्थ गायलेल्या गाण्याने मोदी मंत्रमुग्ध झाल्याचं पहायला मिळालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा तीन दिवसीय दौरा आटोपून इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. इजिप्तची राजधानी कैरो इथल्या विमानतळावर त्यांचं आगमन झालं. तिथं त्यांचं लष्करानं बँड वाजवून जोरदार स्वागत केलं. कैरोमध्ये शोले या चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ या गाण्याने जेना नावाच्या इजिप्तशियन महिलेने त्यांचं स्वागत केलं. हे गाणं ऐकूण पंतप्रधान मंत्रमुग्ध झाले. त्यांनी टाळ्या वाजवून या महिलेचं कौतुक केलं. “पीएम मोदींना भेटून खूप छान वाटले” असं जेना म्हणाली. याशिवाय तिने माध्यमांना ‘लग जा गले’ हे गाणं ऐकवलं.
#WATCH | An Egyptian woman sings 'Yeh Dosti Hum Nahi Todenge' to welcome PM Modi in Cairo pic.twitter.com/Ce4WGcSYhc
— ANI (@ANI) June 24, 2023
उद्या PM मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह आई सीसी यांची भेट घेणार आहेत. हेलिओपोलिस युद्ध स्मारक आणि अल हकीम मशीद इथं भेटीदरम्यान या दोन नेत्यांमध्ये अधिकृत चर्चा होणार आहे. तसेच कैरो इथं मोदींचं आगमन झाल्यानं तिथले अनिवासी भारतीय मोदींच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. PM मोदींचा इजिप्तमधील हा पहिलाच अधिकृत राजकीय दौरा असून या ठिकाणी दोन दिवस विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राजधानी कैरो इथं पंतप्रधानांचं विमान लँड झाल्यानंतर इजिप्तचे पंतप्रधान मोस्ताफा मॅडबॉली यांनी त्यांचं स्वागत केलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम