निवडणूक आयोगाचा पवारांना मोठा धक्का !
दै. बातमीदार । १० एप्रिल २०२३ । राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी स्थानीक पक्ष असणार आहे. या बातमीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्यातची शक्यता नाकारता येत नाही.
पक्षाने राष्ट्रीय पक्षाचे जे निकष होते, ते पूर्ण केले नाही, असे आयोगाने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून फेरविचार करण्यात आला होता. त्यानंतर आयोगासमोर पक्षाच्या वतीने पटेल यांनी बाजू मांडली होती. त्यामध्ये त्यांनी सर्व कागद पत्रे सादर केली होती. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाला कोणताही धोका नाही, असे राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता आयोगाने पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जुलै २०१९ मध्येच देशातील इतर राष्ट्रीय पक्षांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्दा पत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना असल्यामुळे त्या पत्रावर कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. निवडणूक आयोगाच्यावतीने मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनाही 2019 मध्ये नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीचा लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये, असा सवाल त्यामध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा आयोगाने काढून घेतला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम