भाजप जिल्हाध्यक्षांची निवड : तीन पदाधिकारींचा समावेश !

बातमी शेअर करा...

देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आगामी होवू घातलेल्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली असून यात जळगाव जिल्ह्यातील तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे तर जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर व रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे यांची निवडीचे पत्रक आज पहाटे प्रदेशध्यक्षांनी काढले आहे.

गेल्या अनेक दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवड प्रलंबित होती. आज पहाटे निघालेल्या पत्राने अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. पक्षातर्फे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत. यात रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम