भडगाव शहर माळी पंच मंडळ अध्यक्षपदी साहेबराव महाजन यांची निवड

बातमी शेअर करा...

भडगाव प्रतिनिधी
भडगाव माळी पंच मंडळाची शनिवार रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाज बांधव विजय लक्ष्मण महाजन हे होते
यावेळी बैठकीत पंच मंडळ अध्यक्ष व सचिव व कार्यकारी मंडळी ची निवड करण्यात आली तसेच १६ जुलै रविवार रोजी संत सावता महाराजांची पुण्यतिथी उस्ताहात प्रतिमा मिरवणूक, गुणगौरव सोहळा व महाप्रसाद च्या कार्यक्रम सह साजरी करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी समाज अध्यक्ष पदी साहेबराव राघो महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी लक्ष्मण दत्तात्रय महाजन, रमेश एकनाथ महाजन, सचिवपदी प्रवीण निंबा महाजन तर सदस्यपदी संतोष माणिक पाटील, संजय बाबुलाल महाजन, सुरेश दगा महाजन, दत्तातय श्रावण महाजन,लक्ष्मण भगवान महाजन, जितेंद्र महाजन, गोपाल छोटू महाजन, ओम अविनाश माळी यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी अनिल महाजन, गोविंद महाजन, भिकन महाजन, सागर महाजन, देवराम महाजन , नितीन महाजन, दिनेश महाजन, विनोद महाजन, गणेश माळी, आप्पा महाजन, रमेश महाजन, प्रकाश महाजन, अरुण महाजन, आण्णा महाजन,अशोक महाजन, गोकुळ महाजन, रविंद्र महाजन, मधुकर महाजन, कमलेश महाजन,बबलू महाजन, रावसाहेब महाजन,संतोष पाटील, जिवन महाजन, दत्तात्रय महाजन, राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम