भारतातही ‘बॅलेट’वर निवडणूक घ्यायला हवी ; के.चंद्रशेखर राव !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  राज्यात गेल्या काही महिन्यापासून भारत राष्ट्र समितीचे पक्ष मोठ्या ताकदीने उभा राहत असून पक्षप्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव राज्यातील अनेक जिल्ह्यात जात नेत्यांची फळी उभारत आहे. नागपूरमध्ये हॉटेल रेडिसन ब्लू येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशात एखाद्या पक्षाने विस्तारासाठी पावले उचलली तर त्याला दुसऱ्या राजकीय पक्षाची ‘ए’, ‘बी’, ‘सी’ टीम म्हणण्याची ‘फॅशन’ झाली आहे, असा टोला भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) पक्षप्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना लगावला. प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाहीने पक्ष विस्ताराचा अधिकार दिला आहे. ‘बीआरएस’ने प्रथम महाराष्ट्रात विस्ताराचे प्रयत्न हाती घेतले आहेत. आठ-दहा दिवसांत आम्ही मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासह इतर राज्यांतही काम सुरू करणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था ढासळत असून आयात वाढून निर्यात कमी होत आहे. त्यामुळे आयात-निर्यात धोरणांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. धर्मगुरूंनी पूजापाठ करायला हवे. त्यांना राजकारणात आणून ढवळाढवळ करणे योग्य नाही. देशातील राजकीय पक्ष व नागरिकांना ‘ईव्हीएम’वर संशय असल्यास विकसित देशाप्रमाणे भारतातही ‘बॅलेट’वर निवडणूक घ्यायला हवी. केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून कोणत्या पक्ष वा नेत्याला संपवणे निंदनीय आहे. नरेंद्र मोदी यांनीही टप्प्याटप्प्याने पंतप्रधानपद मिळवले. त्यांना आजच्यासारखे दडपले गेले असते तर त्यांना सर्वोच्च पद मिळू शकले नसते. भारतात प्रत्येकाला मोफत शिक्षणाची सोय हवी. देशात ‘बीआरएस’ची सत्ता आल्यास लोकसभा, विधानसभेच्या ३५ टक्के जागांमध्ये वाढ करून त्या महिलांसाठी आरक्षित केल्या जातील, असेही राव म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम