पाकिस्तानात भारतीय विमानाचे इमर्जन्सी लँडिंग !
दै. बातमीदार । १३ मार्च २०२३ । विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाची तब्बेत बिघडल्यामुळे इंडिगो एअरलाइनच्या विमानाचे पाकिस्तानतील कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हि घटना दिल्ली-दोहा इंडिगो विमानात अत्यंत वाईट घटना घडली आहे.
इंडिगो एअरलाइन्सकडून याविषयी माहिती देण्यात आली. याविषयी इंडिगोने, विमानतळावर वैद्यकीय पथकाने प्रवाशाला मृत घोषित केलं. हा प्रवासी नायजेरियन नागरिक असल्याची माहिती दिली. इंडिगो फ्लाइटमध्ये (6E-1736) एका प्रवाशाला विमानात मध्यभागी अस्वस्थ वाटू लागले होते. यानंतर फ्लाइटच्या पायलटने कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली.
कराचीमधील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की, ‘भारतीय विमान कंपनीचं विमान दिल्लीहून दुबईला जात असताना उड्डाणाच्या मध्यभागी एक प्रवासी आजारी पडला.’त्यानंतर इंडिगो विमानाच्या वैमानिकानं वैद्यकीय आणीबाणीमुळं आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती, जी कराची विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकाने मंजूर केली.
अब्दुल्ला असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव असून तो नायजेरियन नागरिक आहे. मात्र, विमान उतरण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. CAA आणि NIH च्या डॉक्टरांनी प्रवाशाचे मृत्यू प्रमाणपत्र प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, इंडिगो एअरलाइनने शोक व्यक्त केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम