राज्यात दहीहंडीचा उत्साह : महिला गोविंदानी दिली 5 थरावर सलामी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ सप्टेंबर २०२३ | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापू लागला असून दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी आज गोविंदांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्राबाबत आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्साह पहाटेपासून दिसायला सुरुवात झाली आहे.

मागाठाणे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आमदार प्रकाश सुर्वे , राज प्रकाश सुर्वे याच्या वतीने भव्य दिव्य दहीकाला आयोजन करण्यात आले आहे याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील मानाची हंडी आनंद दिघे यांनी सुरुवात केली होती. टेंभी नाका इथे पहिल्या गोविंदा पथकाचे आगमन झाले आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना त्या पावसाचा आनंद घेत हे पथक ठाण्यात दाखल झालं आहे. मुलुंड येथील साईराज गोविंदा पथकाचे गोविंदा सलामी देण्यासाठी सज्ज आहेत. पाऊस कोसळत असला तरी त्यांच्या उत्साह कुठेही कमी झालेला नसून या मानाच्या हंडीच्या ठिकाणी सलामी देणे हेच आम्ही मानाचं समजतो अशी भावना गोविंदा व्यक्त करत आहेत.

आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून समाधीवर श्रीकृष्णाचा अवतार रेखाटण्यात आला होता. भाविकांनी जन्माष्टमीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांचे कीर्तन झाले, तर गोकुळ पूजा विश्वस्त ॲड विकास ढगे यांच्या हस्ते करण्यात आली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम