
उद्योजक अनुपम मित्तल यांच्या वडिलांचे निधन !
दै. बातमीदार । ३० मे २०२३ । अगदी कमी कालावधीत उद्योगात आपले वलय निर्माण केलेले उद्योजक व शार्क टँक इंडिया या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचे परीक्षक अनुपम मित्तल यांचे वडील गोपाल कृष्ण मित्तल यांचे निधन झाले आहे.
शार्क टँक इंडिया या कार्यक्रमामुळे अनुपम मित्तल यांना विशेष लोकप्रियता मिळाली. अनुपम मित्तल प्रसिद्ध उद्योजक असून ते पीपल ग्रुपचे मालक आणि Shaadi.com या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत. काही दिवसांपूर्वी अनुपम मित्तल यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे याची माहिती माहिती दिली होती. या कार्यक्रमात अनुपम मित्तल यांच्यासोबतच ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, ‘शुगर कॉस्मेटिक्स’ कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि ‘एमक्योर फार्मास्युटिकल्स’च्या कार्यकारी संचालक नमिता थापर हे सगळे परीक्षकाची भूमिका साकारत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम