
जळगाव जिल्ह्यात मतदानाला प्रतिसाद; दुपारपर्यंत ४४.९७ टक्के मतदान
जळगाव जिल्ह्यात मतदानाला प्रतिसाद; दुपारपर्यंत ४४.९७ टक्के मतदान
१८ नगरपरिषदांमध्ये मतदारांची उत्स्फूर्त गर्दी
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा वेग दुपारी साडेतीनपर्यंत लक्षणीयरीत्या वाढला असून एकूण ४४.९७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळच्या तुलनेत दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रांकडे मोठ्या संख्येने धाव घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसले. शांततेत आणि सुरळीत वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू आहे.
जामनेर येथे ४१.३२ टक्के, तर भुसावळमध्ये ४०.४१ टक्के मतदान झाले. यावलमध्ये मतदारांनी उत्साह दाखवत थेट ५६.२५ टक्क्यांची नोंद केली. फैजपूरमध्ये ५५.१२ टक्के, पाचोरामध्ये ४०.३१ टक्के आणि वरणगावमध्ये ४९.६० टक्के मतदान झाले. अमळनेरचा सहभाग ४४.५१ टक्क्यांवर स्थिरावला.
चाळीसगावमध्ये ४३.९४ टक्के, सावद्यात ४३.४८ टक्के तर चोपड्यात ४५.१२ टक्के मतदान झाले. भडगावमध्ये ३३.३७ टक्के अशी तुलनेने कमी नोंद झाली. रावेरने ५०.९४ टक्के मतदानासह जिल्ह्यात सरस ठरले. धरणगावमध्ये ५१.५३ टक्के, एरंडोलमध्ये ५६.५१ टक्के आणि शेंदुर्णीमध्ये ५१.५२ टक्के मतदान झाले.
पारोळ्यात ४८.४९ टक्के, नशिराबादमध्ये ४५.६५ तर मुक्ताईनगरमध्ये ४१.४८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दुपारनंतर वाढलेल्या उत्साहामुळे संध्याकाळपर्यंत मतदानाचा एकूण टक्का आणखी वाढण्याची चिन्हे असून सर्वत्र प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम