हे पदार्थ खाल्यानेही दुखू शकते डोके !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जानेवारी २०२३ । हिवाळ्यात काही व्यक्तीना नेहमी डोकेदुखीचा त्रास जाणवू लागत असतो. तर काही लोकांचं डोकं स्ट्रेसमुळेही दुखू शकतं. पण तुम्ही रोज खात असलेल्या काही पदार्थांमुळे डोकेदुखी होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? होय, आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयींमुळेही डोकेदुखी वाढू शकते. असे काही विशिष्ट पदार्थ आहेत, ज्यांचे नियमित सेवन केल्याने डोकेदुखी होऊ शकते. कोणते पदार्थ सतत खाल्ल्याने डोकेदुखी होऊ शकते, ते जाणून घ्या.

डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरणारे पदार्थ
– तुम्ही दररोज चीजचे सेवन केले तर त्यामुळेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. चीजमध्ये टायरामाइन नावाचा घटक असतो. हा एक असा पदार्थ आहे जो रक्तवाहिन्या संकुचित करतो. त्यामुळेही काहींना डोकेदुखीचा त्रास होतो. डोकं दुखत असेल तर चुकूनही कोणत्याही पदार्थात चीज टाकू नका.

– रेड वाईन प्यायल्यामुळेही डोकेदुखी वाढू शकते हे तुम्हाला माहीत आहे का ? तुम्ही दिवसभरात कितीही मद्यपान केले तरी सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी सुरू होते. प्रत्येकाने मर्यादित प्रमाणात दारू प्यावी. अल्कोहोलच्या अतिसेवनाने यकृतही खराब होऊ शकते.

– काही लोकांना चॉकलेट खायची खूप आवड असते. ते एका दिवसात 2-3चॉकलेट्स खाऊ शकतात, तुम्हीही असं करत असाल तर आजच ही सवय बंद करा. चॉकलेटमुळे केवळ तीव्र डोकेदुखीच होत नाही तर शुगर लेव्हलसुद्धा वाढू शकते. चॉकलेटमध्ये टायरामाइन नावाचा घटक आहे, जो एक संयुग आहे. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

– कृत्रिम गोड पदार्थ किंवा आर्टिफिशिअल स्वीटनर्सचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. कारण त्यामध्ये एस्पार्टेम नावाचा घटक असतो, ज्यामुळे डोपामाइनची पातळी कमी होते. डोपामाइनच्या कमी पातळीमुळे, काही लोकांमध्ये डोकेदुखीची शक्यता वाढते.

– आबंट फळांमध्ये ऑक्टोमाइन नावाचे संयुग अथवा कंपाऊंड असते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. ज्या लोकांना आम्लयुक्त फळे सहज पचत नाहीत, त्यांना लिंबू, द्राक्षे आणि संत्र्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखीच्या वेळी या आंबट फळांचे सेवन टाळणे उत्तम ठरते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम