
दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ । गेल्या 24 तासांत देशात 201 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना पत्र पाठवले आहे. त्यात लिहिले आहे की, देशात कोरोनाचा वेग मंदावला आहे, पण येणाऱ्या आव्हानासाठी आपण आधीच तयार राहायला हवे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसेच, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवठा यंत्रे चांगल्या स्थितीत ठेवावीत, असा सूचना दिल्या आहेत.
गेल्या 24 तासांत देशात 201 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, भारतात 3,397 सक्रिय रुग्ण आहेत. रिकव्हरी रेट सध्या 98.8% आहे. गेल्या 24 तासांत 183 लोक बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,41,42,791 झाली आहे. दुसरीकडे, लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाचा अहवाल आला आहे. त्यानुसार देशातील 75% लोकांना बूस्टर डोस मिळालेला नाही. आतापर्यंत, कोणत्याही राज्यात बूस्टर डोसचे कव्हरेज 50% पर्यंत पोहोचलेले नाही. तथापि, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये 40% पेक्षा जास्त लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे.
27 डिसेंबर रोजी रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील
मांडविया यांनी राज्यांना 27 डिसेंबर रोजी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांचे मॉक ड्रिल घेण्यास सांगितले आहे. विशेषत: ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटरबाबत राज्यांना चेतावणी दिली. विशेष म्हणजे 2020-21 मध्ये या दोन गोष्टींची मोठी कमतरता होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकारला ही व्यवस्था मजबूत ठेवायची आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम