हेल्मेट असल्यावरही भरावा लागेल हजारो रुपयांचा दंड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ मार्च २०२३ । राज्यात सध्या मार्च महिन्याच्या अखेरीस सुरुवात झाली असतांना प्रत्येक रस्त्यावर वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसू लागल्याने अनेक नागरिकांनी हेल्मेटचा वापर करू लागले आहे. पण जर तुम्ही हेल्मेटचा जरी वापर करत असाल तरी तुम्हाला हजारो रुपयाचा दंड भरावा लागू शकतो.

नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र इथे तर अजबच प्रकार आहे. हेल्मेट घालून आणि नियम पाळूनही तुमचं 2000 रुपये चलन कापलं जातं. नेमकं कुठे आणि यामागचं काय कारण आहे समजून घेऊया. तुम्ही जर कार किंवा बाईक घेऊन बाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची. तुम्हालाही भरावा लागू शकतो 2000 रुपयांचा दंड वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस आणि अधिकारी अनेक नवीन नियम आणत आहेत. वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन वाहतूक नियमांचा अवलंब करण्यात येत आहे.

नुसतं डोक्यावर हेल्मेट घातलं मात्र ते व्यवस्थित लॉक केलं नसेल तर कलम 194D MVA नुसार 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. BIS नोंदणीकृत हेल्मेट असणं आवश्यक आहे. ते नसेल तरी तुमच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. एकूण हा दंड 2000 रुपये असू शकतो असंही सांगण्यात आलं आहे.
रस्ते वाहतूक विभागाने नुकतेच लहान मुलांना घेऊन जाताना पाळावे लागणाऱ्या अनेक सुरक्षेचे नियम आणले आहेत. प्रौढांनी हेल्मेट घालावे, तर मुलांनीही बेल्ट घालावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बाईकचा वेग हा 40 किमी पेक्षा जास्त असेल तरी 1000 रुपये दंड भरावा लागेल अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय 3 महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो. तेलंगणा परिवहन विभागाने नुकताच वाहतूक चालनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. चलनावर डिस्काउंट ऑफर जाहीर केल्याचे आधीच माहीत आहे. आता चालान व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध होणार आहेत. हैदराबाद वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम