
दररोज तुमच्या शरीराला ‘इतक्या’ कॅलरीज हव्या
दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । तुम्हाला माहित आहे का तुमच्या शरीरात किती कॅलरीज असायला हवे, त्या जर कमी झाल्यातर तुमच्या शरीरावर खूप त्रास होवू शकतो, नेहमी सामान्य माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि शरीराचे वजन संतुलित राखण्यासाठी सुमारे २०००-२५०० कॅलरीज आवश्यक असतात. वजन कमी करण्यासाठी कॅलरीवर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. अनेकदा वाढते वजन ही लोकांच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. वजन कमी करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात.
मग तासंतास जिममध्ये वेळ वाया घालवण, मन मारून थोडसच खाणं किंवा कोणकोणते काढे पिणे, पण यानेही त्यांना इच्छित फळ मिळतेच अस नाही. जास्त वजन हे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईडसारख्या अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते.जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर सर्वप्रथम आहारावर नियंत्रण ठेवा. जेवतांना कॅलरीज कमी असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
सामान्य माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे २०००-२५०० कॅलरीज आवश्यक असतात. तर एका महिलेला निरोगी राहण्यासाठी दररोज १८००-२१०० कॅलरीज आवश्यक असतात. कॅलरीची गरज ही व्यक्तीचे वय, उंची, वजन, क्रियाकलाप पातळी आणि पचन क्षमता यावर देखील अवलंबून असते. जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर तुमचे वजन सहज नियंत्रित करता येते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या. मांसाहार कमी करा आणि आहारात भाज्यांचा अधिक समावेश करा.पोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या गव्हाच्या पिठातून कोंढा न काढता म्हणजे न चाळता कणिक भिजवावी.अन्नामध्ये तेलाचे सेवन कमी करा. तळलेले अन्न खाणे कमी करा. जेवणात कमी फॅट असलेले योगर्टचे सेवन करा. चिरलेली फळे दह्यात मिसळून खा, शरीराला अधिक पोषक आणि ऊर्जा मिळेल. दुधाऐवजी टोन्ड दूध वापरा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम