समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्वांचाच हातभार महत्वाचा : समीर जैन

बातमी शेअर करा...

भडगाव ( प्रतिनिधी ) : –
स्वत: सोबतच समाजाला पुढे नेण्याचे काम प्रत्येक व्यक्तीवर असते. प्रत्येक व्यक्ति हा समाजाचं देणे लागतो. आपल्यासह समाजाचाही विकास व्हावा, यासाठी सर्वांचा हातभार हाच त्यातील महत्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन मास्टरलाईन फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा ऑईल कंपनीचे संचालक समीर जैन यांनी केले.

येथील सोमवंशी क्षत्रिय कासार समाजातर्फे आयोजित कुपनलीका लोकार्पण व कासार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मास्टरलाईन फाऊंडेशनतर्फे कै. धरमचंदजी जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कासार समाजास बोअरवेल करून देण्यात आली असून हा लोकार्पण कार्यक्रम येथील कालिकामाता मंदिर, कासार गल्लीत आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मास्टरलाईन इंजिन ऑईल कंपनीचे संचालक सुयोग जैन, तालुका मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भंडारी, मास्टरलाईनचे जनरल मॅनेजर संजय भंडारी, कासार समाजाचे अध्यक्ष संजय कासार, उपाध्यक्ष सुनिल कासार, युवक मंडळाचे अध्यक्ष अमोल कासार, दिपक कासार, महिला अध्यक्षा जयश्री कासार यांची मुख्य उपस्थिती होती.
पुढे बोलतांना समीर जैन म्हणाले की, कासार समाजातील जुन्या पिढीने मोठ्या कामाला सुरूवात करून दिली असून नवीन पिढी या कामाला पुढे नेत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. कालिकामाता मंदिर भव्य असून आमच्या हातूनही या कामाला हातभार लागल्याचे समाधान आम्हालाही आहे. समाजासाठी कुठलंही काम हाती घेतल्यास समाजाच्या प्रत्येक व्यक्तिवर ती जबाबदारी आहे कि, ते पुर्णत्वास जाईपर्यंत उभे राहणे. किंवा पुर्ण करणे. एकट्याने समाजात काही होत नसते. त्याला समाजाचाच हातभार लागतो. त्यामुळे समाज विकास हे उदिष्ट समोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल करावी, असेही जैन यांनी नमुद केले.कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी मान्यवरांच्या हस्ते व कासार समाज बांधवांच्या उपस्थितीत कालिका मातेची महाआरती करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा कासार समाजातील पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला. बोअरवेलची पूजा करून बटन दाबून लोकार्पण करण्यात आले.

विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करत कृष्णा कासार, प्रसाद कासार, ज्ञानदीप कासार, पुर्वा कासार, पुनम कासार, श्रेयस कासार तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पुजा कासार यांचा समाजातर्फे गौरव करण्यात आला.

पितापुत्राचा मास्टरलाईनतर्फे सत्कार

कासार समाजाचे उपाध्यक्ष सुनिल कासार व त्यांचे चिरंजीव मंदार कासार या दोघं पितापुत्रांचा एकाच दिवशी वाढदिवस असल्याने मास्टरलाईन फाऊंडेशनतर्फे समीर जैन व सुयोग जैन यांनी त्यांचा सत्कार केला.
दरम्यान, मनोगतात कासार समाजाचे जेष्ठ बाळू कासार यांनी जैन परिवाराने बोअरवेल देऊन मोठं दान दिल्याचे सांगितले. तर स्वप्नजा कासार हिने जैन बांधवांचे ऋण वर्षानुवर्षे समाज लक्षात ठेवील, असे सांगितले. यावेळी समाजातील मनोज कासार, विजय कासार , प्राविण कासार , सुरेश कासार , राजेंद्र कासार ,निरज कासार ,भास्कर कासार, मंगेश कासार, अमोल कासार, निलेश कासार, राहुल शिंदे, आकाश कासार, चेतन कासार, कैलास कासार यांच्यासह इतर सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सुनिल कासार यांनी केले तर आभार दिपक कासार यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम