माजी मंत्री देशमुखांचे तुरुंगाबाहेर येताच जल्लोषात स्वागत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । महाविकास आघाडी सरकाच्या काळात शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज जामिनावर सुटका झाली. सुमारे १४ महिन्यानंतर त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे.

कोर्टाची ऑर्डर तुरुंगाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्याची संपूर्ण पुर्तता पार पडल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. एक वर्ष १ महिना आणि २७ दिवस त्यांना तुरुंगात रहावं लागल.

अनिल देशमुख यांच्या स्वागताला जाण्यासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान उपलब्ध करून दिले. यावर चर्चा सुरूय. याबद्दल अजित पवार म्हणाले की, आज दुपारी 1 वाजता मी व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मुंबईला आलो आहोत. त्याच विमानाने पुन्हा आजच नागपूरला परतणार आहोत. शासकीय विमाने कुणाला वापरायला द्यायची, हा सर्वस्वी अधिकार राज्यांच्या प्रमुखांना असतो. तसेच, मी देखील विरोधी पक्षनेते व कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे ही सुविधा वापरण्यात गैर काहीच नाही. माध्यमांना यावर भाष्य करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यावर मी टीका करणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम