माजी मंत्री देशमुख यांना दिलासा : उद्या होणार तुरुंगातून सुटका !
दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपदी असलेले अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय. सीबीआयची याचिका मुंबई हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय.
देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम