माजी मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम वाढला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ राज्यातील महाविकास आघाडीतील नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे तर दुसरे नेते असेलेले माजी मंत्री नवाब मलिक यांचा मुक्काम वाढला आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसाची वाढ करण्यात आली आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते नवाब मलिक यांच्यावर सध्या न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप लावले होते. ते म्हणाले होते की, मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे. जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असून दिवाळीनंतर बॉम्बस्फोट करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्याच्या थोड्याच वेळानंतर नवाब मलिकांनीही पत्रकार परिषद बोलावली. ज्यामध्ये त्यांनी फडणवीसांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले होते.
दुसरीकडे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ते जे सांगत आहेत ते सलीम जावेदची गोष्ट किंवा इंटरव्हलनंतरची फिल्म नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. या आरोपांवर नवाब मलिक यांनी म्हटले होते की, फडणवीसांनी ‘राई का पहाड’ करून हे प्रकरण मांडले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की दिवाळीनंतर बॉम्ब फोडेन, बॉम्ब फुटला नाही, पण आता उद्या रात्री दहा वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडेन.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दोन नावे दिली होती. त्यात सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम पटेल यांचा उल्लेख होता. फडणवीस म्हणाले होते की, सरदार शाह वली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहेत, ज्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो टायगर मेमनचा साथीदार होता, तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी त्यांने केली होती. त्यानेच टायगर मेमनच्या वाहनात आरडीएक्स लोड केले होते. दुसरी व्यक्ती मोहम्मद सलीम पटेल आहे, जो दाऊद इब्राहिमचा माणूस होता. फडणवीस यांनी तो हसीना पारकरचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड असल्याचे सांगितले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम