माजी सैनिक व आरोग्य सेवक राजू गायकवाड सेवानिवृत्त

बातमी शेअर करा...

भडगाव – प्रतिनिधी

येथिल शासकीय आरोग्य विभागातील आरोग्य सेवक राजु रंगनाथ गायकवाड उर्फ -सनी बॉस हे दि. ३१जानेवारी राेजी सेवा निवृत्त झाले. त्यांनी आरोग्य विभागात १६ वर्ष प्रामाणिक सेवा देत शिरगाव जि. सिंधूदुर्ग व गिरड ता. भडगाव येथे सेवा केली आहे. तसेच या अगाेदर त्यांनी आर्मी मध्ये १८ वर्ष सेवा केलेली आहे. सर्वांशी मनमिळाऊ व अजात
शत्रु म्हणुन त्यांची परिसरातुन
ओळख आहे.

सेवानिवृत्ती बद्दल ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन तसेच माजी सैनिक फाऊंडेशन भडगाव च्या वतिने अध्यक्ष प्रमाेद पाटील. उपाध्यक्ष देविदास पाटील. सचिव भिमराव माळी, विजय पाटील, शांताराम भाेई, सुनिल पाटील. दगडु पाटील,शिवाजी पाटील,ऊत्तम पाटील,दिपक पाटील,
चिंतामन पाटील, निंबा बडगुजर,परमेश्वर तावडे,संजय पाटील, आदी माजी सैनिकांनी त्यांचा सेवानिवृत्ती बद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. व पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम