Excise चे राजकिरण सोनवणेच्या घरावर छापा; कोट्यवधींच्या संपत्तीचा पर्दाफाश; सुमारे 41 लाखांचा मुद्देमाल जप्त
रक्षकच झाले भक्षक; संपूर्ण जिल्ह्यातून होते लाखो रुपयांची वसुली, कपाटेंचे कपाट अवैध वसुलीने भरले
Excise चे राजकिरण सोनवणेच्या घरावर छापा; कोट्यवधींच्या संपत्तीचा पर्दाफाश; सुमारे 41 लाखांचा मुद्देमाल जप्त
रक्षकच झाले भक्षक; संपूर्ण जिल्ह्यातून होते लाखो रुपयांची वसुली, कपाटेंचे कपाट अवैध वसुलीने भरले
जळगांव । प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Excise) मोठी कारवाई केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे उप निरीक्षक राजकिरण सोनवणे यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये कोट्यवधींच्या मालमत्तेचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
दरम्यान भुसावळ विभागाचे (Excise) निरीक्षक सुजित कपाटे हे मुख्यालयी राहत नसून ते नाशिक वरून अप डाऊन करतात आणि सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसापैकी फक्त 2-3 दिवस कार्यालयात हजेरी लावत असल्याचे त्यांचेवर स्थानिक लोकांचे आरोप आहेत.
त्या कालावधीत फक्त अवैध वसुली कडे लक्ष देतात आणि भुसावळ पासून जवळच असलेल्या सासुरवाडी येथे हजेरी लावतात, असा आरोप त्यांच्यावर होत होता,
या घटनेने श्री कपाटे यांच्या अवैध वसुलीवर देखील शिक्का मोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षापासून श्री कपाटे हे भुसावळ येथे ठाण मांडून आहेत,
त्यामागील रहस्य हे आता उघड होत असून यापुढे अजून, आगे आगे देखिये होता है क्या? असे बोलले जात आहे. अजून बरेच काही अवैध वसुलीची प्रकरणे बाहेर येतील यात तिळमात्र शंका नाही. त्यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.
संपत्तीचा तपशील:
राज्य उत्पादन विभागाचे (Excise) उप निरीक्षक राजकिरण सोनवणे यांच्यावर विविध प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप होते. 23 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्याविरुद्ध व त्यांचा पंटर (खासगी इसम) किरण माधव सूर्यवंशी वय – 37, रा. नवीन हुडको, भुसावळ यांचे विरुद्ध
फैजपूर पोलिसात गु. र. नं. 288/2024 गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी श्री सोनवणे हे राहत्या घरून फरार झाल्याने सदर घर सीलबंद करण्यात आले होते.
म्हणून विशेष न्यायालय भुसावळ यांचेकडून आरोपी श्री सोनवणे यांचे घराचे झडती घेण्याकरिता सर्च वारंट घेण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवार दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 7.30 वाजता,
उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise) पथकातील अधिकारी, 2 पंच, व्हिडिओ ग्राफर कॅमेरासह श्री सोनवणे यांच्या भाडोत्री घरावर मूळ घर मालक यांचे उपस्थितीत छापा टाकला.
यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड, सोने, चांदी आणि महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
छाप्यादरम्यान पुढील संपत्ती आढळून आली:
1. 1 लाख 49 हजार 290 रुपये किमतीच्या 2144 देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या.
2. 2 हजार 500 रुपये किमतीचे 25 लिटर हातभट्टीचे दारू तयार करण्याचे साहित्य.
3. 2 लाख 15 हजार 254 रुपये किमतीचू बुलेट मोटर सायकल.
4. 14 लाख रुपये किंमतीचे किया सेलटॉस कंपनीचे कागदपत्रे.
5. 1,50,000 रुपये किमतीचे 3 तोळे सोन्या चांदीचे दागिने.
6. 9 MM पिस्टलच्या 10 रिकाम्या पुंगळ्या
7. 1 लाख 91 हजार रुपये रोख
8. 17 लाख 90 रुपये किमतीच्या सोने चांदी खरेदी केल्याच्या मूळ पावत्या
9. 2 लाख रुपयेच्या TV, फ्रिज, AC ईतर वस्तू तसेच बँकेचे व ईतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. या छाप्यात एकूण 40 लाख 98 हजार 44 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी सोनवणे सध्या फरार असून, त्यांचे पंटर ( खासगी इसम) किरण माधव सूर्यवंशी वय – 37, रा. नवीन हुडको, भुसावळ त्यांचा शोध सुरू आहे.
सदर घर झडतीची कारवाई लाच लुचपत नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घागरे – वालावलकर, जळगांव विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश जी ठाकूर, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. स्मिता नवघरे या करीत आहेत.
या प्रकरणाची चौकशी उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाकडून केली जात आहे.
ACB चा इशारा:
कोणालाही या प्रकरणाशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती असल्यास, त्वरित लाच लुचपत प्रतिबंधक विभागास कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा👇
आमदार किशोर आप्पा पाटील मंत्री व्हावेत म्हणून शिवसैनिकांची प्रभू श्रीरामचंद्र चरणी महाआरती
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम