अमळनेरात खळबळ ; अल्पवयीन मुलाच्या मारहाणीनंतर संचारबंदी लागू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जून २०२३ । अमळनेर शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजार परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक झाल्यानंतर अमळनेर शहरात संचार बंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी रात्री उशिरा काढले आहे. त्यामुळे आता शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सराफ बाजार परिसर व्यापाऱ्यांचा असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. लहान मुलांच्या भांडणातून दंगल झाल्याचा अंदाज आहे दगडफेकीचे कारण समजू शकले नाही पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. पोलिस दंगलीमागील संशयितांचा शोध घेत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन केले आहे.

काय आहे आदेशात ?
दि.९ जून रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात दि.10.6.2023 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते 12.06.203 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत आली आहे. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये वाढ करणेत्त येईल. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम