
राज्यात खळबळ : ४०० जणांचं धर्मांतर ?
दै. बातमीदार । ८ जून २०२३ । देशात अनेक ठिकाणी ऑनलाईन धर्मांतरचा अनेक घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात देखील अशा घटनेचा विषय मोठा प्रमाणात सुरु झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन आता मुंब्र्यात असल्याची बाब उघड झाली आहे. मुंब्रा येथे सुमारे 400 जणांचं धर्मांतर झाल्याची धक्कादायक माहिती गाझियाबादच्या पोलीस आयुक्तां दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईजवळील मुंब्रा भागात 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी हा गौप्य स्फोट केला आहे. गाझियाबादचे पोलीस आयुक्त निपुण अग्रवाल यांनी या माहितीची पुष्टी केली आहे. गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये तब्बल 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचा उल्लेख होता. याप्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत. तपास सुरु असल्याची माहितीदेखील अधिकाऱ्याने दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम