फडणवीसांचे मोठ वक्तव्य : भाजपच राहणार ‘बॉस’
बातमीदार | ३ ऑक्टोबर २०२३
राज्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या घडामोडी घडत असून सध्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपची दादर येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं आहे.
या बैठकीमध्ये फडणवीसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तारकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ‘राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे’, असं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सध्या राज्यात शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या एकत्रिकरणाने सरकार चालत आहे. अशातच भाजप हाच बॉस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्यांच हे वक्तव्य आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करेल का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तर बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ‘स्वतः साठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर फडणवीस यांनी विस्तारकांना पुढील एका वर्षाचा रोडमॅप बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. “आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आले असले, तरी राज्यात भाजप ईज ऑल्वेज बॉस आहे. युतीमधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम