फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार म्हणाले…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० नोव्हेबर २०२२  संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत राजकारणातील कटुतेवर भाष्य केले होते. त्याला लागलीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करीत उत्तर दिल आहे. फडणवीस म्हणाले कि, राजकारणातली कटुता कुठलाही एक पक्ष संपवू शकत नाही. तर त्यासाठी सगळ्यांनी मिळून ठरवावे लागेल. त्यासाठी नेत्यांनी शांत रहायचं अन् इतरांना बोलायला लावायचं हे थांबवावं लागेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गुरुवारी खासदार संजय राऊत यांना लगावला.

संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, अशा प्रकारचे राजकारण देशाने कधीच पाहिले नाही. पारतंत्र्यातही शत्रूंसोबत चांगला व्यवहार केला जायचा. मात्र, मी संपूर्ण यंत्रणेलाच दोषी ठरवणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता कमी झाली पाहिजे, या फडणवीसांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात सर्वच नेते एकमेकांशी सातत्याने भेट घेत असतात. मी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही लवकरच भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणातील कटुता दूर करायची असेल, तर सगळ्यांना मिळवून ठरवावे लागेल. कुठलाही एक पक्ष ही कटुता संपवू शकत नाही. नेत्यांनी शांत रहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं हे थांबवावं लागेल.

संजय राऊतांच्या जामिनावर बोलताना फडणवीस म्हणाले की, कोर्टाने एक निर्णय दिला आहे. तो निर्णय योग्य की अयोग्य ईडी बोलेल. ते उच्च न्यायालयात गेले आहेत. त्याच्यावर बोलणं माझ्याकरता योग्य होणार नाही. कोर्टाने काय म्हटलं, काय योग्य. काय अयोग्य. हायकोर्टाचं झालंकी बोलू. वन नेशन, वन इलेक्शनवरही फडणवीसांनी भाष्य केले. ते म्हणाले, माझं त्याला पूर्ण समर्थन आहे. महाराष्ट्रामध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेखाली कमेटी नेमली होती. तिच्या रिपोर्टमध्ये वर्षात कुठल्यान कुठल्या भागात आचारसंहिता सुरू असल्याचे समोर आले. सगळ्या निवडणुका एकत्र झाल्या तर खर्च वाचेल. त्यामुळे राजकीय पक्षांनाही सोयीचं राजकारण करण्याऐवजी भूमिका घेऊन सामोरं जावं लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम