नागपूरला लागलेला कलंक म्हणजे फडणवीस !
दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ । राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत अजित पवारांनी मोठी फूट पाडली असून आता शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे राज्यात दौरा करीत असतांना उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मोठा घणाघात केला आहे. भाजपमध्ये निष्ठावंतांचे काय हाल होत आहेत, हे तुम्हाला दिसत असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर हालत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे, फडणवीसांचे “नाही,नाही नाही’ म्हणजे हो, हो, हो’ असते. राष्ट्रवादीशी युती करणार नाही असे त्रिवार सांगितल्या नंतरही राष्ट्रवादीचा पक्षच पळवून भाजपात सामील केला, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
नागपूरमध्ये सोमवारी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपचे हिंदुत्व आरएसएसला मान्य आहे का, असा सवाल केला. तसेच देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे, असा आरोप केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपच्या प्रमुखाला देखील कर्नाटकात लोकांनी नाकारले. अखेर त्यांना बजरंगबलीचा आश्रय घ्यावा लागला. तरी देखील त्यांना लोकांनी नाकारले. कारण भ्रष्ट जनता पार्टीने ज्या पद्धतीने तिथे घोटाळे केले. त्यामुळे तसे घडले आहे.
उद्धव ठाकरे यांनी बोलताना मोबाईलवर फडणवीसांची ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस म्हणतात की, एकवेळ सत्तेपासून दूर राहू, पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. त्यानंतर ठाकरे म्हणाले की, असा खोटा बोलणार माणूस हा नागपूरला कलंक आहे. किती खोटं बोलायचे याची काही परिसीमा नाही का. काल ज्यांना तुम्ही भष्ट्राचारी म्हणत होता त्याला भाजपमध्ये सदाचारी कसे म्हटले जाते. ते लगेच विकासपुरूष कसे होतात. बाजारबुण्ग्यांना घेतल्यामुळे निष्ठावंतांची वाट लागलेली आहे, अशी टीका त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नाव न घेता केली.
हृदयात राम अन् हाताला काम हे हिंदुत्व आम्हाला हवे आहे. मात्र, ज्याने मोठे केले त्याला विसरून जाण्याची ही वृत्ती आहे. त्यांची मजल इथपर्यंत गेले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल लाभले. बरे झाले ते कोश्यारींचे पार्सल गेले. चंद्रकांत पाटलांनी देखील फुलेंचा अपमान केल्याचा आरोप ठाकरेंनी केला. बाळासाहेब ठाकरे हे फोटोत नाहीत. ते समोर बसलेल्या माणसांत बसले आहेत. बाळासाहेबांनी घडवलेले मर्द, मावळे हे सर्व माझ्यासोबत आहेत. पण, तुम्ही धनुष्यबाण गद्दारांच्या हातात दिला हे अतिशय चुकीचे झाले. त्यामुळे हिंदुंत्वांशी तुम्ही बेईमानी केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सभेच्या शेवटी एक शपथ दिली. ते म्हणाले की, ईडी, सीबीआय धार्जिणे सरकार घालवायचे आहे. लोकशाहीसाठी लढायचे आहे. ही लढाई लोकशाहीच्या रक्षणाची लढाई आहे. त्यासाठी शपथ घ्या. जिंकेपर्यंत लढू असा प्रण करा आणि कामाला लागा, असे आवाहन ठाकरेंनी केले. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सभेच्या शेवटी एक शपथ दिली. ते म्हणाले की, ईडी, सीबीआय धार्जिणे सरकार घालवायचे आहे. लोकशाहीसाठी लढायचे आहे. ही लढाई लोकशाहीच्या रक्षणाची लढाई आहे. त्यासाठी शपथ घ्या. जिंकेपर्यंत लढू असा प्रण करा आणि कामाला लागा, असे आवाहन ठाकरेंनी केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम