फडणवीसांना निकाल माहित असावा ; शरद पवार !
दै. बातमीदार । ८ मे २०२३ । राज्यातील एकनाथ शिंदे यांचे सरकार पडणार अशा गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देखील टोला लगाविला आहे.
पवार म्हणाले कि, राज्यातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे. तो काय आहे हे मी सांगू शकत नाही. बहुतेक तो निर्णय फडणवीस यांना माहिती असावा. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील, असा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेऊ नये, यासाठी भाजपच्या अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. या नाट्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची टीका भाजपकडून होत होती. मात्र, आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून कामाला लागणार आहे, असे पवारांनी जाहीर केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम