
शिंदे गट संपविण्याचा फडणवीसांचा ट्रॅप ; अंधारे यांची खोचक टीका
दै. बातमीदार । २५ डिसेंबर २०२२ । राज्यात भाजप नेते देवेद्र फडणवीस यांचा पक्ष वाढविण्यासाठी ट्रॅप असून ते शिंदे गटाला लवकरच भाजपमध्ये घेवून पक्ष वाढवून शिंदे गटाला संपविणार असल्याची खोचक टीका आज पंढरपुरात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की भाजप वाढविण्यासाठी हा देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांना भाजपमध्ये घ्यायचे, आणि शिंदे गटाला सपवायचे हा भाजपचा प्लॅन आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना हे समजत नाही, की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस भाजप वाढवत कधी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून पंतप्रधान होतील हे कळणार नाही असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.
यापुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार हे वाकेरी संप्रदायाचे नसून ते मोहन भागवत सांप्रदायाचे कीर्तनकार प्रहसनकार असल्याची घाणाघाती टीका केली आहे. पंढरपूर दौऱ्यावर असताना अंधारे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंधरा वर्षानंतर ती क्लिप व्हायरल कारण आता काही प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर त्यांना देता येत नाहीत, अशी टीका वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर अंधारे यांनी केली. तसेच पंतप्रधान मोदी हिंदुत्ववादी नाहीत हे सुब्रमण्यम स्वामींचे वक्तव्य गांभीर्यपूर्वक आणि विचार करण्यासारखे आहे. कारण स्वामी हे भाजपचे जुने जाणते नेते आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे पुढे म्हणाल्या की, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू हा माझा रांगडा भाऊ थोडा चुकला आहे,त्यांना समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम