फडणवीसांची खोचक टीका : ठाकरे गटात पडणार मोठी फुट !
दै. बातमीदार । १६ मे २०२३ । देशातील सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षावर गेल्या आठवड्यात निकाल दिला. हा निकाल देताना अपात्र आमदारांबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. यानंतर सोमवारी ठाकरे गटाकडून विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेण्यात आली. अध्यक्ष विदेशात असल्यानं अपात्रतेबाबत आपण निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटानं उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडे केली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हटलं फडणवीसांनी? ठाकरे गटाच्या मागणीवर फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
खरं सांगायचं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पोपट मेलेला आहे. पण तसं जाहीर केलं जात नाहीये. तसं जाहीर केलं तर लोक थांबणार नाहीत, म्हणून ते वारंवार मागणी करत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते. महापालिका निवडणुकीवर प्रतिक्रिया दरम्यान महापालिका निवडणुका कधी होणार याबाबत बोलताना सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणूक लागू शकते, असं सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. मी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचा अंदाज लावून बोलतो. साधारण जुलैत सुनावणी आणि ऑगस्टपर्यंत निकाल आला तर सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका होऊ शकतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीवर हल्लाबोल यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर वज्रमूठ सभेवरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत. सभेत कोणी कुठे बसायचे? कोणी पहिलं बोलायचं? यावरून वाद सुरू आहेत. शरद पवार यांनी मविआतील नेत्यांबद्दल आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेलं समोर आलंच आहे, अशा शद्बात फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम