राज्यात फडतूस गृहमंत्री लाभले ; उद्धव ठाकरेंचा घणाघाती टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ एप्रिल २०२३ ।  राज्यात ठाकरे गटाच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेसह भाजप मैदानात असतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सरकारमधील नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका केली. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत मारहाण केली. यात रोशनी शिंदे या जखमी झाल्यात. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रोशनी शिंदे यांनी माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार, असा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम