सोन्याच्या दरात घसरण ; जाणून घ्या काय आहे दर ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ ।  सोन्या-चांदीच्या किंमतींवर डॉलर, जागतिक मंदी, कच्चा तेलाचे भाव, राजकीय घडामोडी, बँकिंग सेक्टरचा मोठा प्रभाव दिसून येतो. यापैकी एका घटकावरील परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीचे गणित बिघडवतो. दिवाळीनंतर दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. प्रति तोळा जवळपास 11 ते 12 हजार रुपयांची तफावत गेल्या सहा महिन्यात दिसून आली. आज खरेदीदारांना या महिन्यातील ऑलटाईम हायपेक्षा सोने-चांदी स्वस्तात खरेदीची संधी मिळाली आहे. चांदीने तर सोन्यापेक्षा गुंतवणूकदारांना मालामाल केले. चांदीतून त्यांना अधिक परतावा मिळाला. दोन महिन्यांपेक्षा आज किंमती जास्त असल्या तरी सकाळच्या सत्रात त्यात घसरण दिसून आली.

आजचा भाव काय
गुडरिटर्न्सने, 14 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केले. सकाळाच्या सत्रात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 10 रुपयांनी घसरले. 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज 56,240 रुपये आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 10 रुपयांनी घसरले. आज हा भाव 61,340 रुपये आहे.

सोने-चांदीने 5 एप्रिल रोजी रेकॉर्ड केला होता. या दिवशी या दोन्ही धातूंनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,400 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,510 रुपये होती. सोने तब्बल 1000 रुपयांनी वधारले होते. त्यापेक्षा आज सोने 170 रुपये प्रति तोळा स्वस्त मिळत आहे. तर चांदीने तब्बल 2490 रुपयांची सलामी दिली. भाव 77,090 रुपये किलो झाला. तर आज चांदीत 900 रुपयांची वाढ झाली. एका किलोसाठी 78,000 रुपये मोजावे लागतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम