दै. बातमीदार । १९ जुलै २०२३ । अनेक महिलांना सोन्यासह चांदीच्या दागिन्याचा पेहराव करण्याची मोठी हौस असते. त्यांच्यासाठी हि बातमी खूप महत्वाची असणार आहे. आज सोन्याचे दरात घसरण तर चांदीचे दर वाढलेले आहे. 19 जुलै 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 75 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,859 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 75447 रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव मंगळवारी संध्याकाळी 59440 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जो आज सकाळी 59859 रुपयांवर आला आहे. मंगळवारी संध्याकाळी 999 शुद्ध चांदीचा दर 75181 रुपये किलो होता. जो आज बुधवारी सकाळी 75447 झाला आहे. म्हणजेच चांदी 266 रुपयांनी महाग झालीये.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम